bachchu-kadu-8-demands-maharashtra-farmers-news

राज्यातील लोकहितवादी आणि प्रखर आवाज म्हणून ओळखले जाणारे आमदार बच्छू कडू यांनी पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. शेतकरी, ग्रामसेवक, विधवा भगिनी, मेंढपाळ आणि कामगार यांच्या जीवनाशी निगडीत 8 महत्वाच्या मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत.
या मागण्यांना सरकार मान्यता देणार का, हा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

1. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी

बच्छू कडू यांची पहिली मागणी म्हणजे शेतकऱ्यांचे थकित कर्ज तत्काळ माफ करावे. शेतीतील तोटा, दुष्काळ आणि बाजारातील अनिश्चित दरांमुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

2. कृषी मालाला हमीभावावर (MSP) 20% अनुदान

शेतमालाच्या हमीभावावर (MSP) थेट 20 टक्के अतिरिक्त अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य दर मिळून शेती फायदेशीर ठरेल, असा बच्छू कडूंचा दावा आहे.

3. ग्रामीण भागातील घरकुलांसाठी शहरीप्रमाणे अनुदान

शहरी भागात जसे घरकुल योजनेत मोठं अनुदान दिलं जातं, तसंच ग्रामीण कुटुंबांनाही 5 लाख रुपयांचं घरकुल अनुदान देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

4. पेऱणीपासून कापणीपर्यंतचा खर्च MREGS मधून

शेतकऱ्यांचा सर्व शेतीखर्च — बी-बियाणे, मजुरी, सिंचन, कापणी — हे सर्व मनरेगा (MREGS) योजनेतून दिले जावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

5. नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा

बच्छू कडू यांनी पर्यावरण आणि स्थानिक लोकांच्या हिताच्या दृष्टीने नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. हा महामार्ग शेतजमिनींवर परिणाम करेल, असा त्यांचा दावा आहे.

6. दिव्यांग, विधवा, निराधार भगिनींना ६ हजार मानधन

सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून दिव्यांग, निराधार आणि विधवा भगिनींना दरमहा ६ हजार रुपयांचं मानधन देण्यात यावं, ही मागणी सरकारसमोर ठेवली आहे.

7. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण

ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंढपाळ आणि मच्छीमार समुदायासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी कडू यांनी केली आहे.

8. ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवा अटींचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. तो कायमस्वरूपी मार्गावर आणावा, असे बच्छू कडू यांनी म्हटलं आहे.

bachchu-kadu-8-demands-maharashtra-farmers-news

यावर आपले मत नोंदवा

Trending