मुंबई | २६ जून २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उत्तन-विरार सागरी मार्ग (UVSL) प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सादर केलेल्या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, मूळ ₹87,427 कोटी खर्चाच्या तुलनेत आता केवळ ₹52,652 कोटी खर्चाचा किफायतशीर पर्याय स्वीकारण्यात आला आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विविध संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

📌 प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

  • एकूण लांबी: 55.12 किमी
  • मुख्य सागरी मार्ग: 24.35 किमी
  • कनेक्टर्स: 30.77 किमी
  • उत्तन कनेक्टर: 9.32 किमी (दहिसर-भाईंदर लिंक रोडशी जोड)
  • वसई कनेक्टर: 2.5 किमी (संपूर्ण उन्नत)
  • विरार कनेक्टर: 18.95 किमी (वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडणी)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या सागरी मार्गामुळे मुंबईच्या उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत जलद वाहतूक सुलभ होईल, तसेच हा मार्ग वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेवाढवण बंदर यांना थेट जोडेल. परिणामी, देशाच्या बंदर आधारीत विकास धोरणाला मोठा हातभार लागणार आहे.

💡 प्रकल्प खर्च कपातीची मुख्य कारणे:

  • लेन डिझाइनमध्ये बदल: 4+4 ऐवजी 3+3 लेन, कनेक्टर्ससाठी 2+2 लेन – त्यामुळे सिव्हिल कामाचा खर्च कमी.
  • स्मार्ट नियोजन: भविष्यातील रस्ते व विद्यमान रस्त्यांची योग्य मांडणी.
  • जमीन अधिग्रहणात बचत: लेन रुंदी कमी केल्यामुळे जागेची गरज कमी – अधिग्रहण व भरपाईचा खर्च घटला.
  • कनेक्टर डिझाइन सुधारणा: दोन खांबांऐवजी एकाच खांबावर आधारित – पर्यावरणीय परिणाम कमी, खर्चात घट.

💰 निधी संकल्पना:

  • ₹37,998 कोटी (72.17%) रक्कम टोल आधारित परतफेडीच्या अटींसह JICA वा अन्य बहुपक्षीय संस्थांकडून प्रस्तावित
  • ₹14,654 कोटी (27.83%) रक्कम महाराष्ट्र सरकार वा MMRDA मार्फत भांडवली स्वरूपात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MMRDA ला सुधारित तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल (PPR) शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


#DevendraFadnavis #UttanVirarSeaLink #MMRDA #MaharashtraDevelopment #SeaLinkProject #MumbaiToVirar #InfrastructureNews #मुंबईसमृद्धीमार्ग #फडणवीसयोजना #उत्तनविरारसीलिंक #विकासकामे #MaharashtraNewsMarathi


यावर आपले मत नोंदवा

Trending