
MNS Raj Thackeray Nashik : स्थानिक स्वराज संस्थंच्या निवडणूक येत्या ४ महिन्यात घ्याव्यात असा आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे राज्यातील महानगर पालिकांच्याही निवडणूका होणार त्यापैकीच नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रमुख राज ठाकरे येत्या १५ आणि १६ मे ला नाशिक दौरा करणार आहेत. काही पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेणार आहेत.
मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युती बाबत चर्चा होत आहे त्यातच आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी काय चर्चा करतात हे पाहणे महत्वच ठरणार आहे.
नाशिक जरी मनसेचा बाल्लेकिला असले तरी गेल्या काही वर्षा पासून नाशिक मनसेला गटातटाच्या राजकारणाने ग्रासलेलं आहे. त्यावर राज ठाकरे काय उपाय योजना करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यावर आपले मत नोंदवा