कुटुंबातील मुख्य कर्ता व्यक्ती जेव्हा जातो त्या वेळेस कुटूंबाला सर्वात जास्त त्रास होत असतो. त्याचंच विचार करता सरकार दारिद्रय रेषेखाली कुटुंबातील कमवता व्यक्ती अपघाती किंव्हा नैर्सगिक रित्या मृत पावल्यास सरकार अश्या कुटुंबाना आर्थिक मदत करते ती पुढील प्रमाणे
योजनेची वैशिष्ट्ये :-
१) कुटुंब दारिद्रय रेषेखालील म्हणजेच बीपील Below Poverty line ( पिवळी रेशन कार्ड ) असावे.
२) मूर्त मुख्य कमावत्या व्यक्तीचे वय हे १८ ते ५९ वर्ष असावे.
३) व्यक्तीचा नैसर्गिक किंव्हा अपघाती मृत्यू झाला असावा.
आर्थिक साहाय्य :-
कुटुंबाला २०००० रुपये इतके आर्थिक साहाय्य दिले जाते.
अर्ज कुठे करायचा?
जिल्ह्याधिकारी कार्यलय, तहसील कार्यालय इथे करू शकतात .

यावर आपले मत नोंदवा