माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यानेते एकनाथ शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे बोले जात आहे. विधसनसभा निवडणुकीच्या निकाला नंतर मूळ गावी जाणे असो किंव्हा देवेंद्र फडणवीसांन बरोबरील बोलण्यात तफावत असो एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत असे बोले जात आहे.

पण गेल्या काही दिवसं पासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षवाढीसाठी मिशन टायगर सुरु केले आहे. त्यातून ज्याप्रकारे एकनाथ शिंदे एक एक माजी आमदारांना आपल्या पक्षात घेत आहेत ते पाहता एकनाथ शिंदे नक्कीच मोठी योजना आखात आहेत असे दिसत आहे. शिंदे गटाने कोकणातील नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यातून राजन साळवी, गणपत कदम, सुभाष बने असे ३ माजी आमदार तर रोहन बने यांच्या रूपाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पक्षात घेतला आहे. त्याच बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखांसह अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षात घेतले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रवेश खूप महत्वाचे ठरणार आहेत कोकणातील अनेक चाकरमानी कामानिमित्त मुंबईत असतात तर मुंबई महानगर पालिकेत ही त्याचा फायदा शिंदेंना होताना दिसू शकतो. शिंदे भारतीय जनता पक्ष पेक्षा अधिक आक्रमक पणे पक्ष वाढवताना दिसत आहेत. त्यातूनच त्यांनी पुन्हातून कसबा विधानसभेचं माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पक्षात घेतले धंगेकर पुणे महानगर पालिकेमध्ये ४ टर्म नगरसेवक राहिलॆले आहेत त्यामुळे शिंदे गटाला फायदा होताना दिसू शकतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने एकनाथ शिंदे दबावाचे राजकारण करताना दिसू शकतात.

Shivsena

Maharashtra Politics, Shivsena News, Eknath Shinde News

यावर आपले मत नोंदवा

Trending