Ravindra Dhangekar Political काँग्रेसचे २०२३ च्या कसबा विधानसभा निवडुकीत निवडून आलेले काँगेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पाहावा लागला आणि त्या नंतर त्याची काँगेस मधील सक्रियता कमी झाली. त्यातच रवींद्र धंगेकरच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी मंत्री उदय सामंत उपस्थित राहिले होते त्यामुळे रवींद्र धंगेकर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मिशन टायगर अंतर्गत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्च्या रंगल्या होत्या.
रवींद्र धंगेकर हे पुणे महानगर पालिकेमध्ये २००२ ते २०२२ असे ४ टर्म नगरसेवक राहिले आहेत. त्यातील ३ टर्म मनसेचे तर १ टर्म काँगेस पुरस्कृत आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती त्यात त्यांचा भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच हेमंत रासने यांनी पराभव केला.
लवकरच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असे बोले जात आहे.
Ravindra Dhangekar News, Pune Congress news, Maharashtra news

